Language: Marathi
Read Time: 4 mins
साठी जवळ यायला लागली कि रिटायरमेंट जस टाळता येत नाही तस राहण्याच्या जागेचा विचार पण टाळता येत नाही. घर हे मूलभूत गरजान पैकी एक असल्यामुळे त्याचा निर्णय न झाल्यास खूप तणाव निर्माण होतो. नौकरी साठी सरकारी किंवा कंपनीने दिलेल्या घरात राहत असाल तर “मी कुठल्या गावात राहू” असा देखील प्रश्न असतो. मुला सोबत राहू का मुली सोबत? का त्यांच्या घरा जवळ एखादे घर बहू? का स्वतंत्र राहू? जर मुले परदेशात असतील तर एखाद्या सिनियर लिविंग मध्ये राहू? नातेवाईक ओळखीचे काय म्हणतील? ..अशे अनेक गुंता गुंतीचे प्रश्न असतात. ज्यांचे जोडीदार वारले असतील विशेषतः जा महिलांना एकट्याने हा निर्णय घ्यावा लागतो त्याच्या वर खूप दबाव असतो.
कुठला हि एक उत्तर, कुठला हि एक मार्ग सर्वांना योग्य होईल असे नसत. प्रत्येकानी आपली परिस्थिती व विचार लक्षात घेऊनच मग हा निर्णय घेतला पाहिजे.
योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही खालील प्रश्नांची अगदी खरी आणि कोणाचाही विचार न करता द्यावी ..
१. मी नवीन फ्लॅट घेऊन सवतंत्र राहू शकते का?
२. Loan / EMI / भाड्यासाठी माझा कडे पुरेशे फंडस् आहेत का ?
३. मला माझ घर (फ्लॅट / बांगला) स्वतःहून किंवा मदतीला लोक लावून व्यवस्थित मेंटेन करता येईल का? त्यासाठी माझ्या कडे पुरेसा निधी आहे का? त्यासाठी माझी पेन्शन आज पुरेशी आहे का? वीस वर्षांनी पण पुरेशी असेल का?
४. राहते घर ज्येष्ठांनी राहण्यासाठी सज्ज आहे का ? तिथे कमोड आहे का? कमोड वरून उठायला व बसायला सोय होणारे हॅन्ड रेल, ग्राब बार्स बसवलेले आहेत का ? योग्य ठिकाणी सुरक्षेसाठी ग्राब बार्स आहेत का ? माझी खोली खालच्या मजल्यावर आहे का ? संडास व बाथरूम खोलीच्या जवळ आहे का? घरात अँटी स्किड टाईल्स आहेत का गुळगुळीत फरश्या आहेत? योग्य ठिकाणी पॅनिक अलार्म बसवलेले आहेत का ? रात्रीच्या अंधारात दिव्याची बटणं चाचपडावे लागू नये यासाठी योग्य जागेवर मोशन सेन्सर दिवे आहेत का ? या सर्व गोष्टी नसल्यास घराच नूतनीकरण करण्यासाठी माझ्या कडे / मुलांकडे फंडस् आहेत का व तशी तयारी आहे का ?
५. माझ माझ्या सुनेशी किंवा जावयाशी पटत का? मी त्यांच्याशी जुळवून घेऊ शकते का ? मी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत दुय्यम स्थान स्वीकारू शकते का ? स्वयंपाकघरातील माझे अधिकार सोडून सुने नुसारचा स्वयंपाक मला जमेल का ?
६. मी माझ्या राहत्या घराशी असलेली ओढ सोडून राहू शकेन का ?
७. मी विविध क्षेत्रातील / जातीतील शेजाऱ्यांशी जुळवून घेऊ शकेन का?
८. स्वयंपाकघर कॉमन असेल तर मला त्यांच्या पद्धतीच जेवण रुजेल का ?
सवतंत्र घरात राहायचा असेल तर १, २, ३ व ४ नंबर च्या प्रश्नांची उत्तर ‘हो’ असायला पाहिजे.
मुलं सोबत / मुली सोबत किंवा त्यांच्या घराजवळ राहायचा असेल तर १, ४ व ५ नंबर च्या प्रश्नांची उत्तर ‘हो’ असायला पाहिजे.
सिनियर लिविंग मध्ये राहायचा असेल तर २, ६, ७, व ८ नंबर च्या प्रश्नांची उत्तर ‘हो’ असायला पाहिजे.
स्वतःच्या घरात सुने सोबत राहायचा असेल तर ४ व ५ नंबर च्या प्रश्नांची उत्तर ‘हो’ असायला पाहिजे.
वरील सर्व पर्याय थोड्या फार प्रमाणात ट्राय करून बघू शकता. तुमच्या मुलांना देखील तुम्ही या निर्णय प्रक्रियेत शामिल करून घेऊ शकता. अनेक सिनियर लिविंग पण ट्रायल घेऊ देतात. वरील सर्व प्रश्न एकारात दिले आहेत कारण जरी आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असाल तरी हे निर्णय घेतल्या वर एकट जरी राहायची वेळ आली तरी सोय झाली पाहिजे.
Good post. I learn something totally new and challenging on sites I stumbleupon everyday. It will always be helpful to read content from other writers and practice a little something from other websites.