7 Job Options after Retirement

Language : Marathi 

Read Time: 6 mins

आज विज्ञानामुळे आयुर मर्यादा वाढली आहे आणि त्याच बरोबर बहुतांश ज्येष्ठ नागरिक त्यांच्या सातारी पर्यंत हमखास सक्रिय असतात. नुसते घरी बसण पण त्यांना पसंत नसत. तुम्ही जर ह्यपायकी एक असाल तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा कारण आम्ही आज तुम्हाला ७ पर्याय सुचवणार आहोत सेवानिवृत्ती नंतर करण्याचे. आणि शेवटी काही टिप्स देखील देणार आहोत.

हे पर्याय सांगण्या आधी खालील प्रश्नांचे उत्तर तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे

  • माझे प्रोत्साहन काय आहे? पैसे ? कंटाळा ? का दोन्ही?
  • मला या कामातून किती पैसे कमवायचे आहेत?
  • ह्या वयात आता कुठल्या प्रकरचे काम करून मला समाधान मिळेल ?
  • मला part time काम करायचा आहे कि full time ?
  • मी स्वतःचा काही व्यवसाय सुरु करू का घरून काम करू ?
  • ह्या कामासाठी मला कुठल्या प्रकारचे प्रशिक्षण घ्यावे लागेल का ?

ह्या उत्तरातून तुम्हाला तुमचा पर्याय निवडणे सोप जाईल.

साठीनंतर तुम्ही तुमच्या सोईनुसार व तुम्हाला किती प्रमाणात बांधिलकी हवी आहे हे बघून निर्णय घेऊ शकता.

पार्ट टाईम Jobs

तुम्ही पार्ट टाईम नौकरीसाठी काही तास राखीव ठेवू शकता. जर निवडलेल्या क्षेत्रात पहिले कधी काम केल नसेल तर स्वतःच थोडे research आणि काही प्रमाणात प्रशिक्षण घेणे उपयोगी ठरू शकते. तुमची स्वतःची गुंतवणूक जरी फार नसली तरी ह्यातून होणारे उत्पन पण बदलते असेल व त्यासाठी तुमची मानसिक व आर्थिक तयारी लागेल.

१. इन्शुरन्स एजंट – बनण्यासाठी पात्रता १२वी पास आणि त्यांची एखादी परीक्षा असते. शून्य गुंतवणूक, कंपनी द्वारे फोने वर लागेल ती मदत मिळणे, तुमच्या मर्जीचे कामाचे तास, वेळेवर कमिशन मिळणे असे अनेक फायदे आहेत. इन्शुरन्स तुम्ही वाहनाचे, आरोग्याचे किंवा व्यवसाय करू शकता. LIC , ICICI Lombard ह्या काही कंपन्या आहेत ज्या ज्येष्ठांचे एजंट म्हणून स्वागत करतात. ह्या कामच्या निमित्याने तुमच्या ओळखल्या देखील वाढू लागतील व मित्र मंडळींचा ग्रुप देखील.

२. रिअल इस्टेट एजंट – बनण्यासाठी विदेशातल्या सारखी भारतात कुठलीही परीक्षा द्यावी लागत नाही कि कुठले सर्टिफिकेट प्राप्त कारण लागत. म्हणून सोप जरी वाटले तरी स्वतःला हे काही प्रश्न विचारा आणि मगच निर्णय घ्या —

  • तुम्हाला स्थानिक अतिपरिचित क्षेत्रे आणि त्यांची निश्चित वैशिष्ट्ये यांचे ज्ञान आहे का?
  • तुम्ही संघटित आणि तपशील-देणारं आहात?
  • तुमच्याकडे संगणक आणि स्मार्टफोनसह मूलभूत तंत्रज्ञान क्षमता आहे का?
  • कठीण लोकांचा सामना करताना तुम्ही विनम्र आणि बिनधास्त राहण्यास सक्षम आहात का?
  • तुम्ही अनिच्छुक ग्राहकांसोबत ठाम भूमिका घेऊ शकता का?
  • तुम्ही साधारणपणे आउटगोइंग आणि आत्मविश्वासाने एका दिवसात अनेक अनोळखी लोकांशी संवाद साधण्यास सक्षम आहात का?

३. व्हिसीटींग फ्याकल्टी – दिवसेन दिवस कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी दर्जेदार समकालीन शिक्षण देण्यासाठी व्यावहारिक ज्ञान आणि अनुभवि ज्येष्ठांना प्राधान्य देऊ लागल्या आहेत. ह्याचा फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मात्र हे कामाचा ठिकाण निवडताना पगार आणि कामाच क्षेत्र याचा नक्की ताळमेळ बसतोय ना हे निश्चित करा. तुम्हाला प्रवास आणि फिरायला आवडत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या गावात पण जाऊन असे वर्ग घेऊ शकता.

४. एखाद्या Startup मध्ये काम करणे सुद्धा एक चांगला पर्याय आहे. Startup मध्ये अनुभवी व्यक्तींची आवश्यकता असतेच आणि तुम्हाला पण तरुण मंडळींमध्ये राहिल्याने उत्साह येऊ शकतो व नवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात. अश्याच पर्शुभोमिवर आधारित एक हॉलिवूडचा चित्रपट ” The Intern ” तुम्ही बघू शकता. त्यामध्ये रॉबर्ट डि नेरिओनी अगदी सुंदर काम केल आहे. पण असणाऱ्या कामाच्या वेळा आणि मिळणार मोबदला याचा नीट विचार करून मग निर्णय घेण योग्य राहील.

फुल्ल टाईम Jobs – आजवर जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरुकरण लांबणीवर टाकले असेल तर हि योग्य वेळ अशे तुमची इच्छा पुरणे करण्याची.

५.  तुम्ही स्वतःच दुकान टाकू शकता. एखादी franchise घेऊ शकता. खाद्यपदार्था पासून ते कार स्पेयर पार्टस पर्यंत कुठली पण franchise तुम्ही घेऊ शकता.  franchiseindia.com वर जाऊन तुम्ही असे अनेक पर्याय शोधू शकता. ते अगदी बारी गोष्टी देखील तुम्हाला सांगतात – गुंतवणूक किती लागणार पासून ते मोबदला किती मिळणार आणि तुमचा दुकान आतून कसे राहणार, तुम्ही माल कुठून घेणार पर्यंत.

सोप जरी वाटले तरी स्वतःला हे काही प्रश्न विचारा आणि मगच निर्णय घ्या —

  • माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी/उद्योजक होण्यासाठी आवश्यक घटक आणि संयम माझ्यात आहे का?
  • फ्रँचायझी होण्यासाठी आवश्यक घटक माझ्यामध्ये आहे का?
  • मी विकत घेण्याचा विचार करत असलेल्या फ्रँचायझीबद्दल मला आवश्यक असलेली सर्व उत्तरे माझ्याकडे आहेत का?
  • जर मी हे करू शकलो नाही तर माझी बाहेर पडण्याची योजना तयार आहे का ?

६. फ्रँचायझी हा पर्याय जर खूप खर्चिक वाटत असेल तर आजवर काम केलेल्या क्षेत्रात स्वतःची कन्सल्टन्सी / कोचिंग क्लास सुरु करू शकता.

सुरू करताना  खालील काही टिपांची नोंद घ्या

  • या मोठ्या पर्वाची योजना आणि तयारी करण्यासाठी स्वत:ला पुरेसा वेळ द्या
  • कौशल्य विश्लेषण करा आणि आवश्यक वाटल्यास ते अपग्रेड करा
  • सेवानिवृत्त होण्यापूर्वीच ग्राहकांची भरती सुरू करा
  • तुमची मार्केटिंगची योजना तयार करा
  • हळूहळू सुरुवात करा आणि तुमच्या गरजेनुसार गती ठेवा

७. स्वतःचा ब्लॉग / youtube channel / podcast सुरु करू शकता.  हे माध्यम फेकते तरुणांसाठीच आहे हि विचार धारा बरोबर नाही. हे माध्यम इतरांशी ऑनलाइन संपर्क साधून एकाकीपणापासून दूर राहण्याची संधी देतात आणि नवीन डिजिटल कौशल्ये शिकून मेंदूला सक्रिय ठेवतात. इतरांसोबत आपले ज्ञान share करण्याचा , आयुष्यभर शिकलेली विद्यमान कौशल्ये आणि प्रतिभा प्रदर्शित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या नातवंडांच्या आठवणींमध्ये राहण्याचा हा एक चांगला मार्ग नाही ..

जरी हे प्रत्येक माध्यम वेगळे असले तरी हे सुरु करण्या आधी विचार करण्यासारख्या समान गोष्टी आहेत.

  • हे माध्यम सुरू करण्यासाठी तुमची प्रेरणा काय आहे?
  • तुम्ही ह्या माध्यमावर किती वारंवार अपलोड कराल?
  • हे माध्यम सुरू करण्यासाठी कोणत्या उपकरणाची आवश्यकता आहे?
  • तुम्ही ह्या माध्यमाची जाहिरात कशी करणार आहात?
  • ह्या माध्यमातुन किती पैसे कमवायचे आहेत.?

योग्य ते उद्दिष्टे सेट करा.

सारांश

तुमच्या वेळेनुसार, तुमच्या घरातील जवाबदारी नुसार तुम्हाला योग्य वाटेल तोच पर्याय निवड. हे सगळे करताना आनंद घेण्यास विसरू नका.

धन्यवाद !