20 Positive Affirmations to Reclaim Enthusiasm and Happiness after retirement

Language : Marathi 

Read Time: 6:47 mins

साठी ओलांडली आहे का? घरात बसून बसून कंटाळा आलाआहे का ? काही नवीन करायला आजूबाजूचे व घरची मंडळी प्रोत्साहन देतायत पण काही करावेसेच नाही वाटत ? कशातच मन रमत नाहीये का ?

जरवरील कुठल्याहि प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर हे नक्की शेवट पर्यंत वाचा – व सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना ५ मिन हे affirmations म्हणा.

मी तुम्हाला आज काही सकारात्मक स्वयंसूचना सांगणार आहे म्हणजेच पॉझिटिव्ह अफर्मेशनस.

आता तुम्ही म्हणाल कि ह्या वयात सकारात्मक विचार च काय करायच- हे फ्याड तर तरुण पिढीच आहेना. तर पहिल्यांदा थोडक्यात तुम्हाला सांगते कि हे ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याचे का आहे. हे सांगण्यासाठी नैराश्यका आणि केव्हा येते हे आपण समजून घेऊया – –

१. रिकामपण

२. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणे व त्याचा ताण घेणे

३. गप्पा मारायला किंवा मनरामवायला सोबत कोणी नसणे

४.एखादी गोष्ट खटकणे पण ती गोष्ट व्यक्त कशी व कोणाकडे करावी हे नसमजणे

५. स्वतःला एखादा आजार असल्याची बातमी कळणे

६. समवयस्क नातेवाईक, ओळखीचे, मित्र, मैत्रिणी यांचे दुःखद निधन होणे व त्याच्या बातम्या कळून मन खचणे

अशी अनेक करणे असू शकतात नैराश्याची . पण या नैराश्यात सतत जगणे ह्यानी तुमच्या मनावर व शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आयुष्यात सकारात्मकता हि हवीच आणि हि कशी आणायची – तर ती सकारात्मक विचार करून येते . कारण आपले विचारच आपले आयुष्य घडवत असतात आणि ह्या वयात नकारात्मक विचार व नैराश्य खूप सहजतेने आपल्या मनात घर करू शकतात .

चला तर मग – सकारात्मकता आपल्या मनात व विचारात आणू जेणे करून आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा एकदा उमेद आणि उत्साह येईल.

तर आरामात बसून हळुवार श्वास घ्या व हळुवार श्वास सोडा

खाली लिहिलेला मोठ्याने म्हणा

१. मी या आयुष्यासाठी ब्रह्माण्डाला आणि देवाला धन्यवाद देते .आज माझ्याकडे जेकाही आहे त्यासाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे.

२. माझा प्रत्येक दिवस वेगळा आहे

३. माझे मन सतर्क आणि ग्रहणक्षम आहे

४. मला न्याय देण्यासाठी माझा देवावर विश्वास आहे

५. मी शांत आहे आणि माझ्या आजूबाजूला शांततेचे वातावरण आहे

६. मी आनंदी आहे

७. माझे मन उत्साही आहे

८. माझ्याकडे असणाऱ्या मर्यादित शक्तीचा व ताकदीचा मी योग्यतो वापर करते

९. मला झेपेल ते व जमेल त्याच गोष्टी करते व ज्या जमणार नाही त्या गोष्टी करणे टाळते.

१०.मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मन रामवण्यासाठी मार्ग शोधते.

११. मी माझ्या दिनचर्येचे आयोजन करून त्याचे पालन करते

१२. माझी बुद्धी तल्ख आहे व ती तशीच राहण्यासाठी मी वेगवेगळे मार्ग शोधून काढते.

१३. माझे स्वतःवर प्रेम आहे व मी आता ह्या वयात स्वतःला व स्वतःच्या तब्बेतीला पहिले प्राधान्य देते.

१४. मी स्वतःची काळजी घेते

१५. मी लक्ष देऊन हळुवार चालते . मी उठल्यानंतर पहिले पाऊल तोल सांभाळूनच ठेवते

१६. माझ्या आयुष्यातील दुःखांना वदुःखापतींना आत्मसात करते व पुढे जाते.

१७. मी बदलांना आनंदाने स्वीकारते

१८. मी नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ते अतिशय उत्साहानी वापरते व त्याचे जतन करते.

१९. मला माहिती आहे कि काही गोष्टींमध्ये मला आता मदतीची आवश्यकता आहे. मी या मदती आवर्जून मागते व ती मदत मिळेपर्यंत धीरधरते.

२०. मला अस्वस्थ करणाऱ्या सर्व विषारांवर मी मातदेते.

हळुवारआपलेडोळेउघडाअगदीअलगदपणे.

ह्या सकारात्मक स्वयंसूचना आवडल्या असतीलतर like करा , Share करा तुमच्या मित्रमेत्रीणी ओळखीचे व नातेवाईकांमध्ये व ह्या स्वयंसूचना नियमितपणे ऐकून तुम्हाला काय अनुभव आला तो आम्हाला comment मध्ये लिहून कळवा. तुमचा feedback आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि आमच्या youtube चॅनेलला देखील subscribe करायला विसरू नका !

धन्यवाद