10 Ideas to Keep Senior Citizens Busy

Language: Marathi

Read Time: 10 Mins

विज्ञानामुळे आयुर्मान वाढले आहे आणि आता पूर्वीचा प्रश्न कि “मी किती दिवस जगणार” बदलून ” मी जर इतके वर्ष जाणार असलो तर मी आनंदी आणि उत्साही कसे राहू ?” असा झाला आहे. एका इकॉनॉमिक सर्वे नुसार आज भारतात ६०% महिला या गृहिणी आहेत व त्यामुळे “निवृत्ती” मुळे पडणाऱ्या प्रश्नांची तीव्रता त्यांच्यापेक्षा जास्त पुरुषांना जाणवते. निवृत्तीनंतर दिनचर्या एकदम बदलते. आजवर तुम्ही तुमच्या नोकरीत व्यस्त होता पण आता तुमच्याकडे खूप मोकळा वेळ आहे. निवृत्ती नंतर देखील आयुष्यात नवनवीन गोष्टी करण्याची व शिकण्याची इच्छा आहे पण मार्ग सुचत नाहीत, किंवा आपण आता अनावश्यक झालो कि काय- अशे विचार तुम्हाला सतावत असतील तर ताण घेऊ नका — कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या मोकळ्या वेळामध्ये करता येतील अशा १० कल्पना ..

चाल तर मग जाणून घेऊ या–

१. सर्वप्रथम – स्वतःला व मेंदूला चालना देणारे काही खेळ खेळा जसे कि सुदुको , शब्दकोडे , जिगसॉ कोडे. तुम्ही आमच्या आधीच्या ब्लॉग 10 GAMES TO KEEP YOUR BRAIN ACTIVE मध्ये याबद्दल तपशीलवार वाचू शकता.

२. दोन – काहीतरी नवीन कौशल्य शिका – जसेकि विणकाम , भारतकाम , क्रोशा ,पेन्सिल स्केचिंग किंवा रंगवायला शिका – वॉटर कलर पैंटिंग म्हणा किंवा ऑइल पैंटिंग म्हणा किंवा ऍक्रेलिक पैंटिंग म्हणा. दागिने बनवणे किंवा ओरिगामी. हे सर्व शिकण्यासाठी किमान खर्च होतो. या सर्व विषयांवर मार्गदर्शनपर व्हिडिओस youtube वर उपलब्ध आहेत.

३. तिसरे – एखादी नवीन भाषा शिका. या सारखी दुसरी गोष्ट नाही. आणि भारतातच बावीस भाषा आहे त्यातली एक जरी शिकायची ठरवली तरी तुमचा वेळ अगदी मजेत जाईल. एखादी परदेशी पण भाषा शिकू शकता. पुढेजाऊन तुम्ही हीच भाषा तुमच्या नातवंडांना देखील शिकाऊ शकाल आणि त्यांच्या सोबत ” Quality time” घालवू शकाल. Opentree , Memrise , Busuu , Babbel असे अनेक online apps आहेत. आणि मार्गदर्शन youtube वर पण उपलब्ध आहे.

४. चार- पुस्तकांचा  क्लब सुरु करू शकता किंवा अशा कुठल्या क्लब मध्ये शामिल होऊ शकता. अनेकांना खंत असते कि कामाच्या ओघात पुस्तके वाचणे मागे पडले. तर हि योग्य वेळ असू शकते तुमची इच्छा पूर्ण करण्याची. वयानुसार काही वयस्करांची मान किंवा डोळे दुखतात व ते खूप वेळ वाचन करू शकत नाहीत. काहींना आपल्या पुस्तकाचे ओझही हातात धरता येत नाही.. त्यांच्यासाठी दोन उपाय आहेत.. एक म्हणजे बुक होल्डर विकत घेणे इथे क्लिक करून . दुसरा म्हणजे पुस्तक वाचायच्या एयवजी ऐकायचे. आजकाल ऑडिओ पुस्तके online apps द्वारे उपलब्ध होतात उदा. Storytel , Audible सारखे. या क्लब द्वारे तुम्ही समवयस्कांची संवाद साधू शकता. या पुस्तकांच्याच गोष्टी म्हणून आपल्या नातवंडांना देखील सांगू शकाल.

५. पाच – लहान मुलांचे वर्ग घा – तुम्हला आवडणारा असा एखादा विषय निवडून तुम्ही तो या चिमुकल्यांना शिकाऊ शकता. एक किस्सा सांगायचं म्हणजे माझ्या आजी हैदराबादला आहेत तर तिथल्या मराठी कुटुंबातील मुलांना मराठी शिकवतात. तुम्ही पण असा काहीतरी प्रयत्न करू शकता. थोड्याफार प्रमाणात तुम्हाला यानी आर्थिक हातभार पण मिळू शकतो. लहान मुलांमध्ये राहून तुम्हाला उत्साह पण येईल. अगदी काहीच नाही तर ” गोष्टी कशा सांगायच्या” याचा पण वर्ग तुम्ही घेऊ शकता. किंवा वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेऊ शकता. तुम्ही आता Online देखील शिकाऊ शकता- उदा. Coursera , Khan Acedmey, Byjus  वर.

६. सहा- बागकाम करा. बागकाम करण्याचे अनेक फायदे आहेत जसेकी ताण कमी करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, तुमच्या कॅलरीज जाळून तुमचे हाडे देखील मजबूत ठेवणे. व एवढाच नाही तर रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. ह्या विषयावरचे अनेक youtube व्हिडिओस उपलब्ध आहेत. अगदी नवशिक्यांसाठी सुद्धा. खत कसे करायचे, कुठल्या प्रकारच्या कुंड्या वापरायच्या, त्या तयार कश्या करायच्या, कमीत कमी जागे मध्ये अगदी सुंदर बाग कशी करायची, आपल्या लहानश्या बाल्कनी ला makeover कसा द्यायचा अशा सर्व विषयांवरचे भरपूर व्हिडिओस आहेत. काही websites तुम्हाला DIY म्हणजेच तुम्ही स्वतः करू शंकणाऱ्या किट्स घरपोच पाठवतात ज्यात बियाणे, ते पेरण्यासाठी वेगळे tray, ह्या बियांचे कोंब तयार झाले कि ते पेरण्यासाठी इको-फ्रेंडली कुंड्या देखील पाठवतात. फार नाही तर अगदी किचेन गार्डन तयार करू शकता. ह्या किट्स sowandgrow.in किंवा thebetterindia.com किंवा अगदी amazon वर पण भेटतील.

७. सात – एखादे नवीन वाद्य वाजवायला शिका – ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुल शिक्षणासाठी किंवा नौकरी साठी वेगळ्या गावात किंवा देशात असतील त्यांचा सामाजिक सुसंवाद एकदम कमी होतो. जर तुम्ही एखादे वाद्य शेकु लागलात तर त्या निमित्याने बाहेर पडणे होईल आणि स्वतःच्या अटींवर लोकांच्या भेटी गाठी हुऊ लागतील. हे वाद्य वाजवता यायला लागले कि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. कोविड मुळे अनेक शिक्षक आता Online classes घेतात. Youtube किंवा Udemy वर अनेकांचे मार्गदर्शनपर व्हिडिओस आहेत. खालील प्रश्नांवर विचार करून मग हे वाद्य निवडा –

  •  मला वाद्य वाजवणे स्वतः करता शिकायचं आहे का ?
  •  हे वाद्य वाजवताना माझ्या शरीराला काही इजा तर नाही होणार .. उदा . बासरी अस्थमा असणाऱ्याने वाजवणे, स्पॉण्डिलायटिस असणाऱ्याने गळ्यात टाकून accordion वाजवणे .. इत्यादी.
  •  मी हे छंदा म्हणून करते का पुढे जाऊन स्टेज परफॉर्मन्स देणार ?

तुमची संगीतमय स्वप्ने प्रत्येक्षात आण्याची हीच वेळ आहे .

८. आठ – एखाद्या क्लबमध्ये सामील व्हा.आपण आजवर स्वतःसाठी जगलो असू तर हीच वेळ आहे समाजासाठी काहीतरी करण्याची. एकाद्या NGO मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करू शकता. सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक NGOs आहेत अगदी लाहान मुलाना शिकवण्या पासून (Pratham , Nanhi Kali ) ते अपंगाची काळीज घेणारे, बायकांच्या अधिकारासाठी लढणार्या पासून ते प्राणी बचाव संघटना ( The Bombay Society For The Prevention Of Cruelty To Animals (BSPCA), Stray Relief and Animal Welfare (STRAW) India). HelpAge India ही ज्येष्ठांच्या अधिकारासाठी लढणारी संस्था पण आहे. NGO नाहीतर Rotary club किंवा Lions club मध्ये सामील व्या. तुमच्या शहरातील Sports club देखील एक चांगला पर्याय असू शकतो. Movie club देखील सुरु करू शकता जर तुमच्या गावात असा कुठला क्लब नसेल तर. तुमच्या काळातील अनेक सिनेमे किंवा नाटक यात तुम्ही बघू शकता व नंतर त्या वेळच्या एकमेकांच्या आठवणींची गोष्ट सांगता येऊ शकते. किंवा Netflix वरचे कार्यक्रम, ते सुद्धा वेगवेगळ्या भाषेतील बघून त्यावर चर्चा करू शकता.

९. नऊ – संस्मरण ( Memoir ) लिहा. तुमच्या स्वतःच्या आठवनिंचा संघ्रह करू शकता. आजवर जर कधीच काही लिहिले नसेल तर आमचा फेसबुक ग्रुप आहे विश्व ज्येष्ठांचे यावर छोट्या छोट्या गोष्टी पोस्ट करण्या पासून सुरवात करू शकता. आत्मविश्वास वाढला कि अजून सोप होईल. ह्या गोष्टी व आठवणींची एकत्रित मांडणी कशी करायची याचा हि एक वेगळा अभ्यास तुम्ही करू शकता. हे लिहिण्यासाठी प्रसिद्ध असण्याची गरज नाही किंवा खूप मोठे प्रकाशन करण्याची देखील गरज नाही. आपल्या नंतरच्या पिढ्यान त्यातून काही शिकायला मिळाले किंवा तुमच्या काळातील गमती जमती जरी कळाल्या तरी झाले.

१०. दहा – एखादी नौकरी करा. तुम्ही तुमच्या सोईनुसार व तुम्हाला किती प्रमाणात बांधिलकी हवी ह्या वरून नौकरीचे अनेक पर्याय आहेत.

निर्णयघेण्यासाठी खालील प्रश्नांचे उत्तर उपयोगी पडतील

  •  माझे प्रोत्साहन काय आहे? पैसे ? कंटाळा ? का दोन्ही?
  •  मला या कामातून किती पैसे कमवायचे आहेत?
  •  ह्या वयात आता कुठल्या प्रकरचे काम करून मला समाधान मिळेल ?
  •  मला part time काम करायचा आहे कि full time ?
  •  मी स्वतःचा काही व्यवसाय सुरु करू का घरून काम करू ?
  •  ह्या कामासाठी मला कुठल्या प्रकारचे प्रशिक्षण घ्यावे लागेल का ?

वरील प्रश्नांच्या उत्तरा वरून तुम्ही खालील यादीतून योग्य तो पर्याय निवडू शकता

– PART TIME

  1.  इन्शुरन्स एजन्ट
  2.  रिअल इस्टेट एजन्ट
  3.  कॉलेज मध्ये व्हिसीटींग faculty
  4.  एखाद्या startup ला एखाद्या कामात मदत करणे

– FULL TIME

  1.  स्वतःचा एखाद दुकान काढणे
  2.  स्वतःची consultancy सुरु करणे इ.

सारांश

आपल मन एखाद्या कार्यात गुंतलेलं असेल तर ” गुड स्ट्रेस ” म्हणजेच चांगला ताण तयार होतो आणि हा ताण आपल्या मेंदू मध्ये काटेकोलामाइन्स व इतर पदार्थ ट्रिगर करतात व हीच रसायने गुरु किल्ली आहेत तुम्हीला आणि तुमच्या मेंदूला उत्साही ठेवण्याची.