10 Games to keep Brain Active of Elderly

Langauge: Marathi 

Read Time: 10 mins

मी काही तरी सांगणार होते तुम्हाला.. काय सांगणार होते?  काय करायला आले होते बरे मी या खोलीत .. आत्ता होत बर डोक्यात … का नाही आठवतय? बापरे माझे काय आता प्रोफेसर बारटक्क्यांसारखे होणार कि काय ?

जर तुम्हाला पण अश्या बारीकसारीक गोष्टी विसरल्यामुळे ताण येत असेल तर हे १० मेंदूला चालना देणारे खेळ खेळा व तुमची स्मृती तेज आणि ताल्लख ठेवा.

आपण जसे साठी नंतरचा प्रवास सुरु करतो तसे शाररिक तंदुरुस्ती जशी महत्वाची तशीच मेंदूची पण तंदरुस्ती महत्वाची आहे.  मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी व स्मृती सुधारण्यासाठी मेमरी गेम्स, कोडी किंवा काही पारंपरिक खेळ उपयोगी ठरतात. मी आज तुम्हाला जे खेळ सुचवणार आहे त्या पैकी बरेच विनामूल्य किंवा अत्यंत स्वस्त आहेत.

चला तर मग वेळ न घालवता सांगते तुम्हाला —-

१. पहिला व मला आवडणारा – सुडोकू हा जपानी खेळ सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. हा आव्हानात्मक मनोरंजक खेळ खेळताना वेळ कसा जाईल ते तुम्हाला कळणार नाही व तुमच्या तार्किक मेंदूला चलनही मिळेल व द्रुत विचार शक्तीला प्रोत्साहनही मिळेल. कुठे खेळायचा तर – सगळ्यात सोप म्हणजे – काही वर्तमानपत्राच्या पुरवणीत जवळपास रोज हे येते – सकाळ , दैनिक भास्कर, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस वगैरे सारख्या अनेक पेपर मध्ये येत. या व्यतिरिक्त मोबाईल वर काही अँप सुद्धा आहेत जसे कि sudoku .com .अँप डाउनलोड करून त्यावर खेळू शकता. आता हा खेळायचा कसा हे पेपरमध्ये पण दिले असते व या विषयावर अगदी मराठी मधून सुद्धा मार्गदर्शन करणारे काही youtube विडिओ देखील उपलब्ध आहेत.

२. दुसरा खेळ आहे तो शब्दकोडी सोडवायचा. हे पण तुम्ही असंख्य पेपर द्वारे सोडवू शकता. बरेच पुस्तक पण आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या पातळीची कोडी असतात. तसेच तुमच्या मोबाइलवर डाउनलोड करू शकणारे काही app पण आहेत. शब्दकोडी किंवा मराठी कोडी म्हणून शोधल तर तीन-चार वेगवेगळी apps दिसतील. तुम्हाला उत्तरासाठी दुसऱ्या दिवशीच्या पेपरसाठी थांबायच नसेल तर हा एक चांगला मार्ग आहे. बर जर तुम्ही मराठीतून शब्दकोडी सोडवत असाल तर इंग्रजितुन किंवा हिंदीतुन पण सोडवून बघ.  इंग्रजि अगदी न्यूयॉर्क टाइम्सचे पण app आहे. ही शब्द कोडी सोडवायचे अनेक फायदे आहेत जसेकि ताण कमी होणे, मानसिक आरोग्य वाढणे व ज्या भाषेत सोडवत असाल त्या भाषेचा शब्द संग्रह पण वाढतो. जर आजवर हे कधीच सोडवले नसेल तर आता सुरु करून बघा.  मन रामावण्यासाठी काहीतरी नवीन व आव्हानात्मक करायचे असेल तर शब्द कोडी हा एक चांगला मार्ग आहे.

३. जिगसॉ कोडे हा तिसरा खेळ. मी सर्वात सुरवातीला काही प्रश्नेविचारले होते बघा,  तर तश्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या अल्प – मुदतीच्या स्मृतीत स्टोर केलेली असतात . जिगसॉ कोडे सोडवल्याने हि अल्प – मुदतीची स्मृती सुधारते तसेच मेंदूच्या पेशीं मधील संबंध द्रुढ होतात व मानसिक गतीही सुधारते. हे कोडे सोडवल्याने ताण कमी होतो व ध्यान आणि साधना केल्या सारखे फायदे होतात.  हे कोडे तुम्हाला विकत घ्यावे लागतील – तर विकत घेताना ह्या गोष्टींकडे लक्ष असु द्या

  1. खूप सोपे किंवा खूप कठीण म्हणजे अगदी न सोडवता येणारे असे दोन्ही प्रकारचे कोडे घेणे टाळा म्हणजे साधारण ६०-७५ तुकड्यां पासून सुरु करून ५०० तुकड्यां पर्यंत घ्या.
  2. कोड्यांचे चित्र पसंत करताना एखादे नयन रम्य चित्र किंवा काही जुन्या आठवणी जाग्रुत करणारे चित्र निवडा.
  3. कोडे सोडवायला अशी खोली निवडा जी प्रकाशमान असेल व जिथे आरामात बसता येईल.
  4. Dementia (स्मृतिभ्रंश) किंवा अल्झायमर असेल तर कोडे सोपे असावेत ज्यात तुकडे कमी असतील. जर आपल्या प्रिय व्यक्तीस संधिवात असेल किंवा लहान तुकडे निवडताना व धरताना त्रास होत असेल तर कोडे निवडताना हे विचारत घ्या.
  5. आपण ज्या टेबलवर/ जागेवर कोडे सोडवायला बसणार तिथे टेबल क्लाथ पांढऱ्या रांगांचे वापरावं .

४. स्विच करा हा चवथा खेळ. ज्येष्ठ नागरिकांना अगदी विनामूल्य असा हा मेंदूचा व्यायाम आहे.  आपण आपल्या प्रबळ हाताने सामान्यतः ज्या गोष्टी करतो त्या करण्यासाठी आपला अप्रबळ हात वापरा. दात घासणे किंवा पाणी पिणे या सारख्या दैनंदिन गोष्टी जर आपला अप्रबळ हाताने केल्या तर मेंदूच्या पेशीत नवीन संबंध निर्माण होतात. तसेच आपल्या अप्रबळ हाताची शक्ती पण वाढते. हे पण जरा जपून व हळूहळू बदल करत करा.

५. बुद्धिबळ – हा अतिशय प्राचीन आणि अस्सल भारतीय असा खेळ असूनही त्याची प्रसिद्धी आणि चालती अजिबात कमी झालेली नाही कारण त्याचे फायदेच इतके आहेत. अगदी आपल्या नावा प्रमाणे तो आपल्या बुद्धीला बाळ देण्याच्या सर्वात महत्वाच्या कार्यात मदत करतो व आपल्याला सतत शिकण्याची संधी देतो.  हा खेळ खेळताना दर वेळेस बुद्धीला वेगवेगळे व नवनवीन आवाहन मिळते व ती तल्लख राहायला मदत होते.  तुम्ही हा बोर्ड व सोंगट्याच्या पारंपरिक पद्धतीने खेळू शकता किंवा आजकाल मोबाईल app देखील उपलब्ध आहेत. या app द्वारे तुम्ही अगदी अनोळखी व्यक्तीं किंवा चक्क कॉम्पुटर बरोबर पण खेळू शकता.

६. उखाण्यांचा खेळ – जर तुमहाला शाब्दांची जुळवा जुळव करायला आवडत असेल तर आपला अगदी मराठ मोळा खेळ तो उखाणे रचणे. तुम्ही कोणते पण विचार उखाण्यांतून व्यक्त करू शकता व हे लक्ष्यात घ्या कि हे करताना तुमच्या मेंदूला आवाहन मिळते व तुमच संप्रेषण कवशल्य पण वाढते. मन रमते हे सांगायला नको. या खेळासाठी प्रेरणा मराठीम्हणी.com वरून मिळू शकतात.  रचलेले सर्व उखाणे तुम्ही एका वहीत लिहून कुठल्याही समारंभात  Share करू शकता. किंवा आमचा विश्व ज्येष्ठांचे नावाचा फेसबुक ग्रुप आहे त्यावर देखी Share करू शकता. अजून एकपर्याय म्हणजे नातेवाईकांसोबत / भिशीत उखाण्यांची अंताक्षरी देखील खेळू शतक.

७. अंताक्षरी – हि तुम्ही फक्त गाण्यांची नाही तर उखाण्यांची, पुस्तकांच्या नावांची , गावाच्या नावांची , मराठी म्हणींची , मुलं-मुलींच्या नावांचीपण खेळू शकता. अंताक्षरी तर सर्वांची लाडकी असतेच व एका शब्दा पासून विविध नाव, गाणे तयार करताना/आठवताना आपल्या बुद्धीला बरीच चालना मिळते व मन रमुन उत्साह येतो व मजाहि भरपूर येऊ शकते.   व्यक्ती आनंदी आणि उत्साही असला तर कुठलाही आजार होण्याची शक्यता कमी असते व जरतो आजारी असेलतर अश्या वातावरणात राहून त्याला त्याच्या आजारपणाची तीव्रता कमी होताना जाणवेल.

८. खरेदीची यादी – हा भलताच मनोरंजक खेळ होऊ शकतो जर १० व अधिक लोक जमले असतील. कसा खेळायचा तर पहिला व्यक्ती त्याला खरेदी करायची जी एक गोष्ट आहे ती सांगणार ,उदाहरण म्हणजे तो म्हणार “मी बाजारात गेलो व तिथून खारीचा पूडा आणला”  मग दुसरी व्यक्ती पाहिल्याने जे सांगितले आहे ती व जोडीला त्याला जी गोष्ट खरेदी करायची आहे ती असे एकत्रित सांगणार, उदाहरण म्हणजे तो म्हणार ” मी बाजारात गेलो व तिथून खारीचा पूडा आणि शेंगदाणे आणले “. अशी हि यादी वाढत वाढत जाते. ज्याला क्रमानी यादी आठवणार नाही तो बाहेर होणार खेळाच्या. तुम्ही हि यादी कश्याची पण बानवू शकता–किराणा मालाच्या वस्तूंची, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची,स्टेशनरी वस्तूंची. ह्या खेळानी फक्त स्मरणशक्तीच सुधारण्यात मदत होते असे नाही तर एकाकीपणा पण दूर होतो.  ह्या खेळाद्वारे मनाला आवाहन देणे ही एक मज्जा होते जी स्मृती कौशल्या सोबत सामाजिक सुसंवादामध्ये सुद्धा वाढ घडवते.

. प्रश्नोत्तरी – साठीनंतर मनाला उत्तेजन देण्यासाठी प्रश्नोत्तरी हा पण एक चांगला मार्ग आहे आणि यामुळे एक आनंदी आणि विनोदी वातावरण निर्माण होऊ शकते.  ह्याखेळात पण दोनपेक्षा अधिक मंडळी असतील तर उत्तम . तर सर्वांच्या संमतीने एक विषय निवडायचा. मग हा विषय कुठलाही असूशकतो,उदाहरण म्हणजे – संगीत, कला, साहित्य, इतिहास , रोजच्या घडामोडी, किंवा अगदी tv वरच्या नवीन व जुने कार्यक्रमपण. मग सहभागी असलेल्या प्रत्येकाने ह्या विषयावरील ५ प्रश्न लिहायचे व अशी सर्वांची मिळून एक प्रश्नांची यादी तयार करायची. ह्या प्रश्नांचे उत्तर गटात किंवा वैयक्तिकरित्या द्याचं हे सर्वांच्या संमतीने ठरवायचे.  उत्तर देतांना तुम्ही त्या प्रस्नाशी निगडित एखादी तुमची आठवण किंवा अनुभव सांगू शकता. Groups तयार केले तर स्पर्धात्मक स्वरूप येण्यासाठी विजेत्यांना एखादे बक्षीस देऊ शकता. हे उत्तर लिहायचे का बोलून सांगायचे हे खेळणाऱ्या व्यक्तींच्या क्षमते नुसार ठरवू शकता.

१०. पत्त्यांचे खेळ – सर्वात प्रियअसे आपले पत्ते. हे पत्ते खेळल्यामुळे आपल्या तार्किक विचारांना ते तीव्र करतात, ताण कमी होतो व उदासीनतेची भावनापण कमी होते. तुम्हाला वैयक्तिकरित्या खेळायचे असेलतर patience  किंवा solitaire खेळू शकता. Group मध्ये खेळत असाल तर रम्मी , बेरीजझबु असे बरेच खेळआहेत. जोडीला कोणी नसेलतर आजकाल online पण तुम्ही अनोळखी लोकांसोबत खेळू शकता – Deck of cards , playing cards , trappola असे विविध app उपलबध आहेत.

आजचा विषयजर आवडला असेलतर like , share आणि subscribe करा. वरील खेळ खळलात तर तुमचे अनुभव नक्की comment  करून सांगा

धन्यवाद!

One thought on “10 Games to keep Brain Active of Elderly

Comments are closed.